सेवापूर्ती गौरव समारंभात सामाजिक बांधिलकी जपत सत्कार उत्साहात
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देत संत साहित्याचा प्रचार
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सेवा निवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात आयोजित करण्यात आला. आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभात विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी पदाधिकारी, संस्था प्रतिनिधी यांचा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी प्रत भेट देत सामाजिक बांधिलकीतून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळ कर्मचारी वृंद, शिवसेना आळंदी शहर, श्री आळंदी धाम सेवा समिती यांच्या वतीने ज्ञानेश्वर चव्हाण सेवापूर्ती गौरव समारंभ आराधना गार्डन मध्ये उत्साहात झाला. आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे वतीने विश्वस्त अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फौंडेशन सचिव रामदास दाभाडे यांचे हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
सेवापूर्ती गौरव समारंभास शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, नगरसेवक सुरेश झोंबाडे, आदित्य घुंडरे, दिनेश घुले, गोविंद कुऱ्हाडे, गटनेते सचिन गिलबिले, उज्ज्वला काळे, कांचन येळवंडे, अनिकेत तापकीर, गोविंद ठाकूर, नंदकुमार वडगावकर, शशिकांत बाबर, सचिन महाराज शिंदे, बालकृष्ण मंडले, बाबासाहेब भंडारे, हनुमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विविध मान्यवर पदाधिकारी यांनी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सेवा काळातील आठवणी सांगत मान्यवरांनी चव्हाण यांचे सेवेच्या कार्याचे कौतुक करीत सेवापूर्ती समारंभास हार्दिक शुभेच्छा देत मनोगते व्यक्त करण्यात आली. पसायदान गायनाने सेवापूर्ती समारंभाची सांगता हरिनाम गजरात, स्नेह भोजनाने झालीं.
