जुन्नर : अंजुमन हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण कार्यक्रम; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह


जुन्नर (रफिक शेख) : अंजुमन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच स्वतःचे संरक्षण करता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने “टॅकवंडो जुन्नर अँड ओसीए पुणे” यांच्या वतीने कलर बेल्ट परीक्षा व बेल्ट समारंभ (Colour Belt Exam & Belt Ceremony) देखील उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विविध बेल्ट मिळवले. यावेळी “प्रत्येक शाळेमध्ये कराटेचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे,” असा संदेश देण्यात आला. लहान तसेच मोठ्या मुला-मुलींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.




कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंजुमन शाळेचे ट्रस्टी हाजी कुद्दूस बेग उपस्थित होते. तसेच शाळेचे शिक्षक इंतेखांब आलम शेख, पालकवर्ग आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.


या कार्यक्रमात सरफराज, माजीसा, उझैर, अब्दुल रहमान आवटी यांच्यासह प्रशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून शारीरिक व मानसिक सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.


थोडे नवीन जरा जुने