!-- afp header code starts here --> AAI CLAS मध्ये ‘सिक्योरिटी स्क्रीनर्स’ पदाच्या १५८ जागांसाठी भरती

AAI CLAS मध्ये ‘सिक्योरिटी स्क्रीनर्स’ पदाच्या १५८ जागांसाठी भरती

AAICLAS Recruitment


AAICLAS Recruitment 2026 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) अंतर्गत सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १५८ रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

वयोमर्यादेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ०१ मे २०२६ रोजी कमाल २७ वर्षांपर्यंत असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना ₹७५० परीक्षा फी भरावी लागणार असून SC/ST, EWS आणि महिला उमेदवारांसाठी ₹१०० फी निश्चित करण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी ₹३०,००० प्रतिमाह, दुसऱ्या वर्षी ₹३२,००० प्रतिमाह आणि तिसऱ्या वर्षी ₹३४,००० प्रतिमाह निश्चित वेतन दिले जाणार आहे.

नियुक्त उमेदवारांची पोस्टिंग संपूर्ण भारतात केली जाणार आहे. त्यामुळे विमानतळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.

---------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ - येथे अर्ज करा

जाहिरात (PDF) - येथे अर्ज करा

ऑनलाईन अर्ज - येथे अर्ज करा

---------------------------------------------


थोडे नवीन जरा जुने