आळंदीत बस स्थानक अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

    


           

आळंदी (अर्जुन मेदनकर) :  येथील PMPML बस स्थानकात प्रवेश करीत असताना बस चे मागील चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी अडीच चे सुमारास घडली. आळंदी नगरपरिषद बस स्थानक आळंदी PCMC बस स्थानक येथे झालेल्या अपघातात अज्ञात पुरुष व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे पार्थिव YCM रुग्णालय पिंपरी येथे पोस्ट मार्टम साठी पार्थिव बॉडी आळंदी पोलिसांनी रुग्णवाहिके तून पुढे पाठविली.  

बस आळंदी बस स्थानकात प्रवेश करीत असताना वाहन चालकाचे बाजूला अचानक एक जन बस चे मागील चाकाखाली येऊन अपघात झाला. यात पुरुष व्यक्ती जागेवरच ठार झाली. नाव अद्याप कळले नाही. अधिक तपास आळंदी पोलिस करीत आहेत.  तात्काळ आळंदी पोलिस आणि दिघी आळंदी वाहतूक पोलिस हजर होत घटनेची माहिती घेतली. परिसरात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी काम पाहिले.

 व्यक्तीची ओळख पटली नसून पुढील तपास आळंदी पोलिस करीत आहेत. या दुर्दैवी अपघाताने परीसरात हळहळ व्यक्त झाली. येथील जागा अपुरी आणि मोठी रहदारी असल्याने बस स्थानक PMPML बस स्थानक एस टी. स्टँड चे जागेत तत्काळ स्थलांतर करण्याची मागणी भाविक, वारकरी यांचे वतीने आळंदीत जोर धरत आहे.

थोडे नवीन जरा जुने