पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेल प्रदेश कार्याध्यक्षपदी पिंपळे सौदागर येथील सौ भाग्यश्री गिरीश मोरे यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे यांनी
भाग्यश्री मोरे यांना नियुक्तीपत्र दिले. मोरे यांचे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून उल्लेखनीय योगदान आहे. त्यांचे शिक्षण बीसीएस व एमसीएस पर्यंत झाले असून यांचे अमेरिकेत आणि दक्षिण आफ्रिकेतील काही काळ वास्तव्य असल्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरील सामाजिक कार्य,व्यवस्थापनाचा मौल्यवान अनुभव आहे.
सामाजिक बांधिलकी, अनुभव, नेतृत्व क्षमता आणि दिव्यांगांबद्दलची निष्ठा यामुळे सौ.भाग्यश्री मोरे आज महाराष्ट्रातील दिव्यांग चळवळीतील एक प्रभावी आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. सौ.मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रमेश मुसुडगे, हरिदास शिंदे, शिवाजी भेगडे,अमोल देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
