पिंपरी चिंचवड : गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी अभिराज फाउंडेशन वाकड या दिव्यांग मुलांच्या शाळेत ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संस्थेचे संचालक डॉ.योगेश सामनेकर आणि डॉ.सुनिता सामनेकर तसेच श्री संजय मुळे, सौ.भारती वाणी, सविता मॅडम उपस्थित होते. संस्थेतील विद्यार्थ्यांकडून छोटेसे रोपटे भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे विकास जगताप,योगेश आढाळे, ऋषिकेश मुसुडगे,विनायक जुनावणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अंजना चिगरे यांनी केले. या वेळी संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

