आळंदी देवस्थान, पालखी सोहळा मालक यांची संयुक्तिक पत्रकार परिषदेत घोषणा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे जिल्हाधिकारी यांनी पुण्यातील दोन दिवसांचे पालखी सोहळ्यास सेवा सुविधा आणि प्रशस्त जगासह इतर मागण्यांवर आळंदी देवस्थानला हमी पत्र आहे. या मुळे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम या वर्षी ही पूर्वी प्रमाणे श्री पालखी विठोबा मंदिरात राहणार असल्याची माहिती माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप यांनी दिली.
आळंदी देवस्थान, पालखी सोहळा मालक यांची संयुक्तिक पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली. आळंदी देवस्थानचे भक्त निवास येथे झालेल्या पत्रकार परिषदेस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, भाऊ महाराज फुरसुंगीकर, पालखी दिंडी समाज संघटना गोसावी महाराज, व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे ९ व १० जुलै २०२६ रोजी श्रींचा पालखी सोहळा मुक्कामी राहणार आहे. तत्पूर्वी आळंदी मंदिरात श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै २०२६ ला लाखो भाविकांचे उपस्थितीत होणार आहे. पुण्यातील पालखी सोहळा मुक्काम परिसरातील नागरी सेवा सुविधा आदी मुळे मुक्कामाचे जागे बाबत विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यात रस्ता रुंदीकरण व पायाभूत सुविधा रस्ता निर्मिती अतिक्रमण हटवून मोकळ्या झालेल्या जागेवर भाविकांसाठी सोयीस्कर प्रवासा साठी सुस्थितीतील रस्ता तयार करण्यात आला आहे. विद्युत खांब स्थलांतर रस्त्यावर अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. पालखी मार्ग अतिक्रमण मुक्त मोहीम पालखी ज्या मार्गाने जाणार आहे, त्या संपूर्ण मार्गावरील फ्रंट मार्जिन मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे. यामुळे पालखी सोहळ्यास मार्गस्थ होताना कुठेही अडथळा येणार नाही.
जिल्हा प्रशासन पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम या वर्षीही नेहमी प्रमाणे याच ठिकाणी करावा, अशी विनंती पुणे जिल्हा प्रशासनाने लेखी हमी पत्र देऊन केली आहे. यासाठी प्रशासनाने जागा मोकळी करणे, रस्ता बनवणे, विजेचे खांब हलवणे आणि संपूर्ण मार्ग अतिक्रमणमुक्त करणे यासाठी पावले उचलली आहेत, जेणेकरून पालखी सोहळा सुरळीत पार पडेल.
रस्ता निर्मिती - अतिक्रमण हटवून मोकळी झालेल्या जागेवर भाविकांना ये-जा करण्यासाठी चांगला आणि सोयीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. विद्युत खांब स्थलांतर - रस्त्यावर अडथळा ठरणारे वीजेचे खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. पालखी मार्ग अतिक्रमण मुक्त मोहीम - पालखी ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गावरील फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्याची धडक कारवाई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे पालखीच्या मिरवणुकीला कुठेही अडथळा येणार नाही. जिल्हा प्रशासन पालखी सोहळा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे.
पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम या वर्षी ही दरवर्षी प्रमाणे त्याच ठिकाणी मुक्काम करावा असे हमी पत्र देऊन आळंदी देवस्थानला विनंती पुणे जिल्हाधिकारी यांनी अपरा एकादशी दिनी केली. या वर आळंदी देवस्थान विश्वस्त मंडळ, पालखी सोहळा दिंडी समाज संघटना, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांची संवाद बैठक होऊन मान्यता देण्यात आली. पुण्यातील दोन दिवसांचा पालखी सोहळा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात ठेवण्याचे अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी जाहीर केला.
या मुळे पुण्यातील पालखी मुक्कामाचा विषय मार्गी लागला आहे. या निर्णयासाठी गेले दोन महिने संवाद, बैठका, पत्रव्यवहार सुरू होता. हा निर्णय व्हावा या पुण्याचे खासदार, केंद्रीय हवाई उडान राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, पुणे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, श्री पालखी विठोबा मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, दिंडी समाज संघटना, फडकरी, वारकरी संप्रदायातील महाराज मान्यवर यांचे समवेत सुसंवाद बैठका घेत सर्वानुमते तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नागरी सेवा सुविधा, मंदिर परिसरातील रस्ते रुंदीकरण,भूसंपादन, रहदारीला अडथळा ठरणारे विद्युत खांब स्थलांतर, अतिक्रमण मुक्त करण्याचे अनुषंगाने लेखी हमी दिल्याने आळंदी देवस्थानने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यातील पूर्वीचे जागेत कायम राहील असा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड उमाप यांनी दिली आहे. या मुळे अनेक दिवस प्रलंबित विषयावरील चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
पुणे महानगरपालिकेने पालखी विठोबा मंदिराच्या लगतच्या जागा भूसंपादनाने ताब्यात घेऊन मंदिराच्या जागेचा विस्तार तसेच प्लॅन आराखडा तयार करून जिल्हाधिकारी पुणे यांना दाखविण्याचे यापूर्वीच्या बैठकां मध्ये ठरले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांनी पुणे महानगर पालिका यांचे कडून आराखडा, उपाय योजना व सुविधांचे बाबत संवाद साधून सादरीकरण करण्यात आले. त्या नुसार आळंदी देवस्थान ला लेखी हमी पत्र दिले. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला महापालिकेचा अहवाल आराखडा याचे अवलोकन करून पुणे जिल्हाधिकारी यांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला १३ जुलै रोजी लेखी हमीपत्र दिले असल्याचे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी सांगितले.
लेखी हमी पत्र मिळाल्या नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, श्री गुरु हैबतराव बाबा पालखी सोहळ्याचे मालक वंशज प्रतिनिधी आणि दिंडी प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेले हमीपत्र यावर सुसंवाद साधत चर्चा करून या वर्षीचा पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम हा पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे या ठिकाणी होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप यांनी जाहीर केले. यावेळी आळंदी ते पंढरपूर आणि पुन्हा परतीचे वारीचा अधिकृत कार्यक्रम त्यांनी जाहीर केला.
ठळक : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आतून आठ जुलैला श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात प्रस्थान.
९ व १० जुलै २०२६ रोजी पुण्यात श्रींचा पालखी सोहळा दोन दिवसासाठी विसरणार.
पुणे येथील श्री पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे दोन दिवस श्रींचा पालखी सोहळा विसावणार निर्णय जाहीर.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या लेखी हमीपत्र नंतर आळंदी देवस्थान नि सर्व संबंधित घटकांबरोबर चर्चा करून संवाद साधून पुण्यातील मुक्काम कायम ठेवण्याचा निर्णय ॲड राजेंद्र उमाप यांनी जाहीर केला.
इंद्रायणी आरती नदी घाटावर हरिनाम गजरात झाली. परंपरेने अपरा एकादशी हरिनाम गजरात साजरी झाली. तेजोत्सवास भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
