पिंपरी चिंचवड : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराच्या सेवादल कार्यकारिणीचा विस्तार करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटपही करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना योगेश बहल म्हणाले की, "महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत आणि अखंड राज्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो. तसेच, देशाच्या आणि राज्याच्या विकासात कामगारांचे योगदान अतुलनीय असून, कामगार दिनानिमित्त त्यांचा गौरव होणे ही काळाची गरज आहे." यावेळी त्यांनी उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्याही शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महिलाध्यक्षा कविता आल्हाट आणि माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सेवादल कार्यकारिणीचा विस्तार:
कार्यक्रमादरम्यान सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सेवादल कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या:
शहर उपाध्यक्ष: चतुर आहेर
शहर कार्याध्यक्ष: बाबासाहेब चौधरी, अलंकार हिंगे, अभिजीत आल्हाट
भोसरी विधानसभा अध्यक्ष: प्रविण पिंजण
या मान्यवरांना शहराध्यक्ष योगेश बहल आणि गटनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
या सोहळ्याला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रमोद साळवे, राजेंद्रसिंग वालिया, संजय औसरमल, युवराज पवार, रविंद्र ओव्हाळ, श्रीकांत कदम, कविता खराडे, दिपक साकोरे, अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर, तुकाराम बजबळकर, भाग्यश्री म्हस्के, दिपक पानसरे, शमा सय्यद, राजीव क्षीरसागर, राजू चांदणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
