!-- afp header code starts here --> सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात खेळण्यांच्या प्रश्न त्वरीत सोडवा.

सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात खेळण्यांच्या प्रश्न त्वरीत सोडवा.

 


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ढिसाळ प्रशासनाच्या कृपेने महात्मा फुले नगर पेठ क्रं.१८/१ येथील सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात येणाऱ्या परिसरातील बालकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. गेले दोन वर्षापासून महात्मा फुले नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले आणि मी यशवंत कन्हेरे सतत सतत जनसंवाद सभेत अतिशय प्रखरपणे आणि तळमळतेने येथील खेळण्यांच्या बाबतीत प्रश्न मांडत आलो, परंतु अधिकाऱ्यांनी आमच्या या मागणीला नियमित केराची टोपली दाखवली. 

या उद्यानात नित्य स्वच्छतेसाठी जात असताना लहान मुलांचा तो घोळका काका आम्हाला हा दुसरा झोका कधी बरे लावून मिळेल. या ठिकाणी नवीन काही खेळणी आणता येतील का..? असा सतत प्रश्नांचा बडीमार होत असताना मनात आमच्या खूप दुःख व यातना होत असतात, परंतु या मुलांच्या समोर हसत हसत अरे बाळांनो होईल लवकर होईल लवकर होईल या अश्वासनाशिवाय शिवाय  काहिच देऊ शकलो नाही. प्रशासकीय सेवेतील तिनं वर्षं आणि निवडणूक झाल्यानंतर साडेतीन महिने या काळात प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना आणून दाखवले, प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालयात जाऊन हजार वेळा तोंडी लेखी विनंती केल्या परंतु कुणालाही या बालकांचे जळून खाक होणाऱ्या आनंद बद्दल जराही खेद अथवा वाईट वाटताना दिसले नाही आम्ही आज ही दिसत नाही. 


आता काय उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे. मुलांना आनंद मिळवायची संधी आणि काळ तो आता तरी गेलेला आहे. पर्यावरण विभागाला सतत सतत पाठपुरावा करून देखील मुलांना आनंदित करणारे तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढल्या गेलेली नाहीत. बघूया या निद्रिस्त प्रशासकीय कुंभकरणांची झोप कधी उघडेल.

कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीपेक्षा हे नुकसान कधी न भरून निघणारे असे भयंकर आहे

यशवंत कण्हेरे 

अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्मा फुले नगर चिंचवड पुणे १९




थोडे नवीन जरा जुने