!-- afp header code starts here --> आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


 पिंपरी चिंचवड - आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना 301 व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप मुख्य प्रवक्ते प्रकाश हगवणे, रिक्षा संघटना अध्यक्ष अंगद मुंगळे, कामगार आघाडी कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना सांगितले की, अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. 

त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, पुरी जगन्नाथ मंदिर व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.असे त्यांनी म्हटले.

      या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उस्तव समिती चे अशोक खरात, राजू दुर्गे, विना सोनवणकर यांनी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा देऊन वैजनाथ शिरसाट यांचा सत्कार केला.

थोडे नवीन जरा जुने