MGID Header Code
Code End

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे.- डॉ. सुरेश बेरी

 


जवाब दो आंदोलन च्या वतीने झालेल्या मीटिंग मध्ये ' सार्वजनिक वाहतूक व्यवस्था' या विषयावर चांगली चर्चा 

PCMC: एकंदर १२ कार्यकर्ते या बैठकीस हजर होते. त्यामध्ये सुधीर मुरुडकर, राम नलावडे, गोकुळ बंगाळ (सर्व लोकजागर), सुरेश बावनकर, उत्तम जोगदंड, सावित्री जोगदंड ( सर्व अंनिस), वैजनाथ शिरसाठ ( आप), सचिन देसाई ( सी पी एम), प्रमोद घनवट, विजय मोरे ( दोघेही युवा भारत), सतीश काळे ( संभाजी ब्रिगेड) आणि मी असे हजर होते. 

 सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते डॉ. बेरी यांनी विषयाची पार्श्वभूमी सांगितली.  ते म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे. खाजगी  वाहनांची संख्या वाढावी यासाठी सरकार बसेस व लोकल्स यांची संख्या कमी ठेवत आहे. पीएमपी, एसटी, रेल्वे यांचे  खाजगीकरण सरकारला करायचे आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसाचे हाल वाढणार आहेत, असे डॉ बेरी यांनी सांगितले. 

      याबाबत जनतेचे प्रबोधन करून लढा उभारला पाहिजे, यावर मीटिंग चे एकमत झाले. त्यासाठी दोन आठवड्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करून त्यात कार्यकर्त्यांचे प्रबोधन करावे असे ठरले. 

     या मेळाव्यानंतर नागरिकांची एक परिषद बोलवावी. त्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना बोलवावे. याच परिषदेत पुढील दिशा ठरवावी, असेही ठरले. 

      या प्रश्नाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा , या विषयावर पत्रके, एखादी पुस्तिका काढावी अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या.

थोडे नवीन जरा जुने