MGID Header Code
Code End

DJ मुक्त गणेशोत्सव; पारंपरिक वाद्यांना पसंती!

Pristine Prosperiya D Wing सोसायटीने निर्माण केला समाजासमोर आदर्श

पिंपरी चिंचवड : गणेशोत्सव म्हटला की मोठा आवाज, DJ आणि भव्य स्पीकर्स यांची चर्चा होते. मात्र Pristine Prosperiya – D Wing सोसायटीने याला अपवाद ठरत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

“आम्ही DJ वाजवणार नाही, मोठमोठे स्पीकर लावणार नाही,”असा निर्णय घेत सोसायटीने यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. तसेच इतर सोसायट्यांनीही पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुलांपासून महिलांपर्यंत विविध स्पर्धांची धमाल!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीमध्ये दररोज लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, पुरुषांसाठी मनोरंजक स्पर्धा तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

आनंदी, उत्साही आणि आपुलकीच्या वातावरणात या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत असून, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.

या स्पर्धांचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली गायकवाड आणि दीपक जाधव सर प्रभावीपणे करत आहेत.

 एकजुटीने उत्सवाची यशस्वी वाटचाल

या संपूर्ण उपक्रमासाठी सोसायटीचे पदाधिकारी व उत्सव समितीचे सदस्य एकत्रितपणे मेहनत घेत आहेत. रेखा वाघमारे, संजय नेवाळे, विलास बाबर, पूजा जाधव, प्रकाश वाघमारे, सोनाली चौधरी, योगेश खिळे, अरविंद गायकवाड, सुब्रता बिस्वास, जैस्वाल, सुरज गोड, स्वप्निल साळवे, लंके आणि मेघराज हजारे यांच्यासह सर्व सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत.

परंपरा जपत, आवाजाला मर्यादा घालत आणि सर्वांना सहभागी करून घेणारा गणेशोत्सव — Pristine Prosperiya D Wing सोसायटीचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

थोडे नवीन जरा जुने