पिंपरी - शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवणारे, ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी विचारातून वंचित, गरीब आणि कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या वतीने चिंचवड येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
शिक्षण हे केवळ काही मोजक्या लोकांचा अधिकार नसून प्रत्येकाच्या प्रगतीचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या दूरदृष्टीतुनच आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन प्रगती साधत आहेत.
या अभिवादन कार्यक्रमास कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कष्टकरी, कामगार उपस्थित होते.
