आळंदी : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे वतीने अधिकमास निमित्त तीन दिवसीय भव्य दिव्य त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी दिली आहे.या धार्मिक मंगलमय अधिकमास पर्वणीत सकाळी काकडा, भजन, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरीपाठ, रात्री हरी किर्तन सेवा त्या नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. भोजन
रात्री १० ते १२ जागर असे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या साठी प्रारंभ गुरुवार ११ जून रोजी होऊन सांगता रविवारी १४ जून रोजी हरिनाम गजरात होईल. वार रविवार जुन २०२६
या धार्मिक पर्वणी चे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट, थोरल्या पादुका तरुण भजनी मंडळ, जिर्णोद्धार समिती देवस्थान ट्रस्ट वडमुखवाडी आणि स्वकाम सेवा मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे. या धार्मिक उत्सवात किर्तनकारभागवत महाराज कचरे ( १ ला दिवस ), मल्लेश महाराज चिंतले ( २ रा दिवस ), सोपान महाराज शिंदे (३रा दिवस ) आणि महेंद्र महाराज नलावडे ( काल्याचे किर्तन ) यांच्या काल्याचे कीर्तने हरिनाम गजरात सांगता होईल. महाप्रसाद वाटपाने हरिनाम गजरात सांगता होईल. या अधिकमास पुण्य पर्व काळातील धार्मिक पर्वणीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ॲड तापकीर यांनी केले आहे.
