!-- afp header code starts here --> "ऑटो टॅक्सी"कष्टकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य!"- शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे

"ऑटो टॅक्सी"कष्टकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य!"- शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे


पिंपरीत रिक्षा-टॅक्सी-कॅब चालकांसाठी भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य शुभारंभ

पिंपरी चिंचवड :भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मोरवाडी मेट्रो स्टेशनजवळ भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उद्घाटन दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पहिल्याच दिवशी २०० पेक्षा अधिक रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कष्टकरी नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या हस्ते श्री. शत्रुघ्न बापू काटे यांचा संत तुकाराम महाराज यांची पगडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

" शत्रुघ्न बापू काटे यांचे प्रतिपादन:

"दिवस-रात्र ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता नागरिकांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. तळागाळातील या कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीच आम्ही राजकारणात आहोत. राजकारणाचा आणि पदाचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच झाला पाहिजे, या उच्च भावनेतून आम्ही ही सेवा करत आहोत."

ते पुढे म्हणाले, "MNGL, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठानने एकत्र येऊन घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. या शिबिरामुळे अनेक चालक बांधवांना वेळेवर उपचार आणि मोफत चष्मे मिळतील. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या या जनहितकारी उपक्रमाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो."

" १००% मोफत वैद्यकीय तपासण्या व चष्मा वाटप

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे खालील चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या:

- डोळ्यांची साधारण तपासणी

- रंग आंधळेपणा (Color Blindness) तपासणी

- मोतीबिंदू (Cataract) तपासणी

- अचूक नंबर तपासणी व मोफत चष्मा वाटप

- रक्तातील साखर (Random Sugar) तपासणी

" डॉ. बाबा कांबळे यांचे आवाहन:

"देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याच धोरणाचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये महिनाभर विविध ठिकाणी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे."

युवा नेते शुभम कांबळे यांनी सांगितले की, "रिक्षा चालवताना धुळीमुळे आणि सततच्या ताणामुळे डोळ्यांचे आजार वाढत आहेत. चालक बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे."


### प्रमुख उपस्थित:

महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा कांबळे,

- महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे

- शिवरुद्र प्रतिष्ठानचे राहुल पाखरे

- पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने

- पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार, विद्यार्थी वादक विभागाचे प्रदीप आयर,

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मारवाडी मेट्रो विभाग उपाध्यक्ष श्याम मोरे, उमेश पवार, जयेश गायकवाड, महेश शिंदे, वैभव सरोदे, गणेश नवगिरे, मल्लेश मंत्री, प्रकाश मकासरे व इतर पदाधिकारी या शिबिराच्या यशस्वी आयोजना साठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व शिवरुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले,

प्रसिद्धी प्रमुख

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व शिवरुद्र प्रतिष्ठान (ट्रस्ट), पिंपरी-चिंचवड

थोडे नवीन जरा जुने