!-- afp header code starts here --> आयुक्त सूर्यवंशी यांनी पथ विक्रेता कायद्याचा अभ्यास करावा - काशिनाथ नखाते.

आयुक्त सूर्यवंशी यांनी पथ विक्रेता कायद्याचा अभ्यास करावा - काशिनाथ नखाते.

 


एक कलमी, एकतर्फी निर्णयाचे  आयुक्तांना अधिकार नाहीत.

PCMC 

पिंपरी दि.९ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त विजय सूर्यवंशी  पदभार स्वीकारल्यापासून   पथ विक्रेता समितीची एकही बैठक घेतली नाही.ते या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना कळलेच नाही, त्यांना कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समजून येत नाहीत आणि बेकायदेशीरपणे कर्मचारी ८ क्षेत्रीय अधिकारी यांची यापूर्वी आणि काल  बैठक घेऊन त्यांना परस्पर हॉकर्स झोन करण्याचे आदेश  ते देत आहेत हे पूर्णतः बेकायदेशीर असून पथविक्रेता समिती व संघटना शिवाय काहीही करता येत नाही; असा लहरी राजा बेकायदेशीर आदेश देतो आणि प्रधान मान हलवून "जी हुजूर"  म्हणतात अशी आजची स्थिती आहे म्हणून आयुक्तानी कायद्याचा अभ्यास करावा अशी टीका  कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त महानगरपालिकेत जॅकेट घालून आलेल्या आयुक्तांना पाहून अनेक जण प्रभावित झाले ते रुजू झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरवासीयांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. आता विकासाची कामे होत नाहीत केवळ खमंग बातम्या अवैध बांधकाम तोडफोड आणि भ्रष्टाचार सह  अतिक्रमण कारवाई फक्त एवढाच विषय सुरू आहे.  शहरवासीयांचा  भ्रमनिरास झालेला असून केवळ बैठका घेणे माध्यमातून चांगले आरोग्य, स्वच्छ नियमित पाणी, सुंदर रस्ते यावरती काम न करता गप्पा मारत आहेत. 

महापालिकेत झालेले चुकीची कामे, बोगस कामे,अनियमित कामे यावरती ही त्यांनी बोलले पाहिजे.  शहरातील  हातगाडी,पथारी, स्टॉल धारकांना वाईट शब्दात बोलण्याची त्यांची हिंमत वाढलेली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी,राजीव जाधव, राजेश पाटील यांचे कालावधीतील निर्णयांचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या पीएम स्वानिधी योजना काय आहे हे त्यांनी तपासावे.  राज्यशासन कष्टकऱ्यांना, कामगारांना विविध योजना देण्यासाठी पंधरवडा साजरा करत आहेत . महापालिका लहरी  आयुक्त मात्र गोरगरीब पथ  विक्रेत्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पंधरवाडा  साजरा करत आहेत हे दुर्दैव आहे.

 आयुक्त केवळ धनिक आणि श्रीमंतांसाठी काम करण्यासाठी आलेले असून त्यांची उठ बस सर्व श्रीमंत कंपनीचे मालक, धनिकासोबत आहे हे अनेकदा  स्पष्ट होत आहे.  मोठमोठ्या बिल्डरचे बांधकामे वाचवायची आणि सामान्यांना  मात्र नख लावायचा असा प्रकार सुरू आहे . महापालिका आयुक्तांनी एकदाही फेरीवाला संघटना, पथ विक्रेता समितीला विश्वासात घेतलं नाही.  त्यांच्याशी चर्चा केली नाही मनमानी व हुकूमशाही पद्धतीने त्यांना प्रशासकीय राजवट सध्या जाणवत आहे.

 त्यांनी पथविक्रेता कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे यासाठी त्यांनी कायदा विभाग व नगर विकास विभाग यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची गरज असल्याचे मत  ही नखाते यांनी आयुक्ताला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशा लहरी पद्धतीने कारभार सुरू राहिला तर जेलभरो आंदोलनाचा इशारा नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे नखाते यांनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने