!-- afp header code starts here --> "शिवशाही शासन पक्ष संस्थापक युवराज दाखले यांना जीवे मारण्याची धमकी!"

"शिवशाही शासन पक्ष संस्थापक युवराज दाखले यांना जीवे मारण्याची धमकी!"


"पिंपरी NCR दाखल, पण आरोपी मोकाट - पोलीस कारवाई करत नाहीत!"  

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांनी तातडीने लक्ष घालावे" - हिंदू मातंग सेनेची मागणी

पिंपरी-चिंचवड :शिवशाही शासन पक्ष संस्थापक प्रमुख तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते लोकसेवक युवराज भगवान दाखले यांना दि. 26/06/2026 रोजी गुन्हेगारी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत संत तुकारामनगर पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे N.C.R. क्र. 0926/2026 दि. 26/06/2026 रोजी दाखल करण्यात आली आहे. B.N.S.S. कलम 351(2), 351(3) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

NCR मधील आरोपी:  

1. बाळासाहेब भागवत - वय 55, रा. अजिंठा नगर, चिखली  

2. बाळासाहेब रोकडे - वय 45, रा. माता रमाबाई आंबेडकर नगर, पिंपरी  

युवराज दाखले म्हणाले:  

"मी मातंग समाजाच्या अ-ब उपवर्गीकरण, आरक्षण, स्वाभिमानासाठी लढतो म्हणून मला धमक्या येत आहेत. 'कपडे फाडू, बघून घेऊ' अशी भाषा वापरली. हा थेट माझ्या जीवावरचा घाला आहे. 

पण मी लहुजींचा, बाबासाहेबांचा, शाहू महाराजांचा सैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा आहे. शहीद संजय ताकतोडे व अविनाश खंडागळे यांच्या सह इतर समाज बांधवांनी उपवर्गीकरणासाठी बलिदान दिले. मी घाबरणार नाही. पण प्रश्न हा आहे - NCR झाली, पण FIR का नाही? आरोपी मोकाट का फिरत आहेत?"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4 मागण्या:

1. तातडीने FIR दाखल करा: NCR चे रूपांतर FIR मध्ये करा. B.N.S.S. 174 नुसार कोर्टाची परवानगी घेऊन तपास सुरू करा.

2. आरोपींना अटक करा: गुन्हेगारी धमकी देणाऱ्यांना 48 तासात अटक करून दहशत बसवा.

3. पोलीस संरक्षण द्या: युवराज दाखले यांच्या जीवाला धोका आहे. तातडीने पोलीस संरक्षण द्या.

4. गृहप्रशासनाने कारवाई करा: पिंपरी-चिंचवड पोलीस कारवाई करत नसेल तर CP साहेबांनी लक्ष घालावे.

इशारा:  

"जर 48 तासात आरोपींना अटक झाली नाही, तर शिवशाही शासन पक्ष व हिंदू मातंग सेना पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालयावर 'संविधान बचाव महामोर्चा' काढेल. आम्ही कायदेशीर लढू, पण रस्त्यावरही उतरू. धमकी देणाऱ्यांना सोडणार नाही!"

जेष्ठ नेते नामदेव रिट्टे म्हणाले:  

"युवराज दाखले हे मातंग समाजाचा आवाज आहेत. त्यांना धमकी म्हणजे संपूर्ण समाजाला धमकी. हा SC/ST Atrocity चा प्रकार आहे. गृहमंत्री साहेबांनी गांभीर्याने घ्यावे."

जय संविधान! जय लहुजी! जय भीम! धमकी देणारे मुर्दाबाद!

थोडे नवीन जरा जुने