कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर जिल्हा वर्धापनदिना निमित्ताने आयोजित करत आहोत.
स्वातंत्र्यानंतर शेती क्षेत्रावर अनेक मानव निर्मित व निसर्ग निर्मित आनेक संकटे आली. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही आणि शेतिला लागणाऱ्या सर्व उपदानाचा खर्च सतत वाढत आहे या खते, कीटकनाशक ,बी बियान्याचा, पशुखाद्य्याचा दर गगनाला भिडला आहे. म्हैशी राखणार्याला चप्पल मिळेना, आणि लोणी खाणारा गब्बर झाला आहे. त्या मुळेच शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे शेतकरी वर्गाचे प्रश्न कवितेतुन व्यक्त व्हावेत म्हणून या वर्षी प्रथमच भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सांस्कृतिक शाखेच्या वितिने वर्धापनदिनाच्या निमिताने एक कवी संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात कवीनी आपली स्वरचित कविता किमान 16ते20ओळीची सादर करावयाची आहे. तरी या संमेलनात कविता सादर करणाऱ्या कविनी आपली कोणती कविता सादर करणार आहे त्या कवितेच्या नावासह आपले नाव संयोजकाना कळवायचे आहे म्हणजे कवितेचा क्रम आणि वेळ ठरवणे सोपे होईल. म्हणून भाग घेणाऱ्या कविनी आपले नाव वकवितेचे नाव 15जुलै 2026 पर्यंत खालील फोन नंबर वर कळवावे त्या नंतर आलेल्या नावाचा विचार केला जाणार नाही ही नम्र विनंती
संमेलनाची तारीख 3ऑगष्ट 2026
विषय: शेतकरी बापाच्या जगण्याच्या व्यथा
वेळ 12 ते 5वाजेपर्यंत
स्थळ : भारतीय शेतकरी कामगार पक्ष मिटींग हाॅल जुन्या देवल क्लब जवळ कोल्हापूर
कविता व नाव पाठवणेचा मो.नं.9096769554
आधिक माहीती साठी वरील नंबर वर संपर्क करा
संयोजक
संतराम पाटील (ग्रामीण कथाकार, कवी, संपादक मासिक देवाभिमान)

