Indian Navy Recruitment : भारतीय नौदलामार्फत (Indian Navy) 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२७ बॅच) अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ६० जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये मेकॅनिकल शाखेसाठी ३० जागा तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेसाठी ३० जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय नौदलात अधिकारी पदासाठी प्रशिक्षणासोबत B.Tech शिक्षणाची संधी मिळणार आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२ वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित – PCM) किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच SSC/HSC इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण असणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी JEE (Main) २०२६ परीक्षा उत्तीर्ण केलेली असणेही आवश्यक आहे.
वयोमर्यादेनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म २ जुलै २००७ ते १ जानेवारी २०१० दरम्यान झालेला असावा. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा फी आकारण्यात येणार नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन व इतर सुविधा देण्यात येणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात करण्यात येणार असून परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
--------------------------------------------------
अधिक माहितीसाठी
भारतीय नौदल अधिकृत संकेतस्थळ - येथे क्लिक करा
जाहिरात (PDF) - येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज - येथे क्लिक करा
--------------------------------------------------
