EdCIL इंडिया लिमिटेडमध्ये ८७९ पदांसाठी मोठी भरती

Big recruitment for 879 posts in EdCIL India Limited


EdCIL recruitment : एडसिल इंडिया लिमिटेड (EdCIL India Limited) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ८७९ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी व सेकंडरी लेव्हल) तसेच PMU कन्सल्टंट अशा विविध पदांचा समावेश आहे. बहुतांश पदांसाठी प्रत्येकी १२५ जागा उपलब्ध असून PMU कन्सल्टंटसाठी ४ जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रतेनुसार, संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, आवश्यक व्यावसायिक नोंदणी/परवाना, तसेच काही पदांसाठी RCI नोंदणी, CTET/AP TET पात्रता आणि विशेष शिक्षणातील अनुभव आवश्यक आहे. PMU कन्सल्टंट पदासाठी Clinical Psychology, Psychology किंवा Special Education मध्ये Ph.D./M.Phil आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० एप्रिल २०२६ रोजी कमाल ४५ वर्षांपर्यंत असावे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा फी आकारण्यात येणार नाही, ही उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी) पदांसाठी ₹३०,००० मासिक वेतन, स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी) पदासाठी ₹२५,०००, तर PMU कन्सल्टंट पदासाठी ₹५५,००० मासिक वेतन निश्चित करण्यात आले आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आंध्र प्रदेश येथे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

--------------------------------------------------

अधिक माहितीसाठी

EdCIL इंडिया अधिकृत संकेतस्थळ - येथे क्लिक करा

जाहिरात (PDF) - येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज - येथे क्लिक करा

--------------------------------------------------


थोडे नवीन जरा जुने