!-- afp header code starts here --> ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकविरोधात मनपाची धडक कारवाई; ४ आस्थापनांवर ₹२० हजारांचा दंड

ग क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकविरोधात मनपाची धडक कारवाई; ४ आस्थापनांवर ₹२० हजारांचा दंड

 


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये बंदी असलेल्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या (Single Use) प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे प्लास्टिकबंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण २७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ४ आस्थापनांमध्ये एकूण ८.६ किलो बंदी असलेले प्लास्टिक साहित्य आढळून आले. त्यामुळे संबंधित ४ आस्थापनांवर प्रत्येकी ₹५,००० प्रमाणे एकूण ₹२०,००० इतका दंड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत आकारण्यात आला.

ही दंडात्मक कारवाई ग क्षेत्रीय ग्रीन मार्शल पथकाच्या वतीने करण्यात आली. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे, गोपाळ धस, आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, सचिन उघडे, आरोग्य मुकादम नेताजी बारणे, अरुण राऊत तसेच कर्मचारी राजू जगताप, भाऊ चाबुकस्वार आणि अभय दारोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांना बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर, साठवणूक व विक्री टाळण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने