!-- afp header code starts here --> पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वत्र डिजिटल कॅमेरे(C C TV ) बसविण्यात आलेले आहेत--- पण उपयोग काय?

पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वत्र डिजिटल कॅमेरे(C C TV ) बसविण्यात आलेले आहेत--- पण उपयोग काय?

 पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वत्र डिजिटल कॅमेरे(C C TV ) बसविण्यात आलेले आहेत या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील गुंडगिरी, अपघात, रस्ता नियम मोडणारे तसेच गाडीवरून जाताना कचऱ्याचे पिशव्या  भिरकाऊण टाकणारे व सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी  कचरा आणून टाकणारे, उद्यानात रात्री वेळ रात्री उच्छाद मांडणारे या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा राबविण्यात आलेली आहे, परंतु या यंत्रणेच्या माध्यमातून या कोणत्या गोष्टी नियंत्रित करण्यास महानगर पालिकेस यश आले आहे का...? या यंत्रणेवर ज्या विभागाचे नियंत्रण असावे तो विभाग कार्यरत आहे का...? 

जर असेल तर कॅमेरा असलेल्या भागात उघड्यावर कचरा टाकणारे यावर काही कारवाई झाली आहे का....? नियमबाह्य वाहतूक अथवा दुचाकी वाहने चालवणाऱ्यांवर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कुठे नियंत्रण झाले आहे का....? कुठेच काही नाही. कॅमेरे दिमाखात आपल्या जागेवर बसले आहेत आणि त्यावर नियंत्रित ठेवणारा विभाग आपल्या खुर्च्यांवर झोपलेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून शहरातील बकालीकरण करणारे उघड वाहत्या ने बकालीकरण करतात. ही सर्व यंत्रणा हात बंद स्थितीत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची नजर इकडे जाईल का....?

यशवंत कण्हेरे 

अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्मा फुले नगर चिंचवड पुणे १९

थोडे नवीन जरा जुने