चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात
आळंदी : केरळ आणि तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अधिकमास मध्ये दर्शन घेतले. या वेळी त्यांनी श्रींची पूजा करून माऊलींच्या चरणी दर्शन घेत नतमस्तक झाले. श्रींचा कृपाशीर्वाद त्याची या भेटी मध्ये घेतले.
या वेळी पुणे प्रमुख जिल्हा व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद पी. वानखेडे यांचेसह आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा श्री ज्ञानेश्वरी, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात झाला.
या प्रसंगी आळंदीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक आदित्य घुंडरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत सोपानकाका संस्थान सासवडचे त्रिगुण महाराज गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे हस्ते वारकरी शिल्प भेट देऊन समस्त ग्रामस्थ आळंदी यांचे हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने विशेष सत्कार झाला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांच्या हस्ते चैतन्य फाउंडेशन गोवा यांनी भारतीय कालगणने नुसार तयार केलेल्या विशेष दिनदर्शिका माऊलींच्या चरणी अर्पण करून दिनदर्शिकेचे करंजा मंडपात प्रकाशन करण्यात आले.
या भेटी प्रसंगी सुरू असलेला अधिक मास आळंदीतील धार्मिक आणि आध्यात्मिक विशेष कालावधीचे महत्त्व याचा विचार करू वारकरी भाविकांत अचानक भेटी मुळे परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मुळे अनेक भाविकांना, व्यापारी यांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. पुढील वर्षी ही या दिनदर्शिकेचे प्रकाशन येथे व्हावे. अशी अपेक्षा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली.
