दिनांक ६ व ७ जून २०२६ रोजी गुजरात येथे झालेला दिव्यांगांच्या( ऑटिझम ) १३व्या नॅशनल क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धात वाकड येथील अभिराज फाउंडेशन मधील ऑटिझम खेळाड्नी उत्तम खेळ खेळून 1 गोल्ड, 2 सिलव्हर, 2 ब्रांझ अशी पदके मिळविली
बक्षिस मिळवलेल्या खेळाडूची नावे
1) ईशान बंगाल --1 गोल्ड, 1 ब्रांझ( स्केटिंग 100,300, मीटर)
2) विश्व कांबळे --1 सिलव्हर( स्केटिंग 500 मीटर)
3) आरुष धायगुडे --1 सिलव्हर( सायकलिंग 500 मीटर)
4) सोमेश साळूंखे--1 ब्रांझ( स्केटिंग 100 मी)
या दिव्यांग खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. क्रीडा शिक्षक विकास जगताप व ऋषिकेश मुसूडगे यांनी या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल अभिराज फाउंडेशनचे कर्मचारी,पालक शिक्षक व संचालक रमेश मुसूडगे व स्वाती तांबे यांनी अभिनंदन केले आहे.
