!-- afp header code starts here --> पीबीएस, पीसीयु चे "एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२६" संपन्न

पीबीएस, पीसीयु चे "एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२६" संपन्न

 


भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी - अमिताभ मिश्रा

पिंपरी चिंचवड : भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी आहे. त्याचा एचआर अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून उपयोग करावा, यश आपलेच आहे असा आत्मविश्वास अदानी पावर लि. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी अमिताभ मिश्रा यांनी व्यक्त केला.

     पुणे, बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे बिझनेस स्कूल, एचआर सक्सेस टॉक, आयस्किल बॉक्स आणि कोबज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२६" चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ उद्योगपती पद्मश्री प्रतापराव पवार, भारत फोर्स कंपनीच्या एच. आर. उपाध्यक्ष डॉ. लीना देशपांडे, पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उद्योजक नरेंद्र लांडगे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, एमइडीसी चे उपाध्यक्ष सचिन इटकर, पीसीईटी प्लेसमेंट डीन डॉ. शीतलकुमार रवंदळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, पीबीएस डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल संचालक डॉ. प्रणव चरखा आणि परीक्षक, विविध गटातील पुरस्कार प्राप्त एचआर विविध कंपन्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

    यावेळी अमिताभ मिश्रा यांनी सांगितले की, एआय हे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि वेगवान करू शकते, परंतु मानवी संवेदनांची,विवेकाची जागा घेऊ शकत नाही. भारतात मोठी स्पर्धात्मक क्षमता आणि मानवी भविष्य सुरक्षित करण्याची क्षमता आहे, त्याचा एचआर अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम करावे, यश आपलेच आहे असा आत्मविश्वास देखील मिश्रा यांनी यावेळी दिला. 

              पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, मानव संसाधन पद्धती आणि नेतृत्वाला सन्मान करणे, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींना नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीसीईटीच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येतात असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.

    पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, एचआर व्यावसायिक संस्था आणि उद्योगपतींनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाला मान्यता देणे आणि त्यांचा गौरव करणे या उद्देशाने पीबीएस आणि पीसीयू यांच्या वतीने एचआर एक्सलन्स अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले असल्याचे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


थोडे नवीन जरा जुने