PCMC
कामगार कल्याण मंडळ उद्योगनगर आणि साई अबोली महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतेच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ओंकार प्रार्थनेने शिबिराची सुरुवात करण्यात आली. योग शिक्षिका वासंती जाधव यांनी योगाचे विविध प्रकारांची माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी साई अबोली संघाच्या महिला सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत नातवंडांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच सभासद चाळीस महिलांचा वाढदिवस औक्षण करून व भेटवस्तू देऊन साजरे करण्यात आला.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोपांचे वाटप करण्यात आले. ही वृक्षरोपे श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी उपस्थित राहत संस्थेला भेट दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन कमलीनी जगताप, सुषमा वाबळे, उषा मराठे, शोभा शिंदे, नीलिमा महाजन, छाया खटावकर, दीपाली देशमुख, संगीता इंगळे, मीना जाधव, नीता हुंडेकरी, ज्योती आवले, ज्योती अडकर, शोभा अडसुळे, स्मिता वाणी, सीमा शेवाळे यांनी केले.

