!-- afp header code starts here --> आळंदी मंदिरात एकादशी दिनी भाविकांची गर्दी ; पुष्प सजावट लक्षवेधी

आळंदी मंदिरात एकादशी दिनी भाविकांची गर्दी ; पुष्प सजावट लक्षवेधी

 


इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती उत्साहात

आळंदी (अर्जुन मेदनकर) : वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरांचे पालन करीत भागवत एकादशी निमित्त परंपरेने आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी पालखी सोहळ्याचे पार्श्वभूमीवर काहीशी मंदावली होती. नदी घाटावर भाविकांची इंद्रायणी नदी स्नानास तसेच इंद्रायणी पूजन करून नदी  घाटावर इंद्रायणी आरती आळंदी देवस्थान आणि इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने हरिनाम गजरात उत्साहात झाली.

  माऊली मंदिरात श्रींचे गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली. श्रींचे वैभवी रूप भाविकांनी आपल्या नेत्रांत साठवीत श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील केली होती. एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती तसेच श्री हजेरी मारुती मंदिरात श्रींची आरती, हनुमान चालीसा भक्तिमय वातावरणात झाली. इंद्रायणी घाटावर इंद्रायणी पूजन इंद्रायणी आरती सेवा समितीच्या संयोजिका अनिता झुजम, सुवर्णाताई काळे आदी महिलांचे हस्ते इंद्रायणी नदी पूजन महापुराची नंतर करण्यात आले. इंद्रायणी आरती आणि पसायदान हरिनाम गजरात झाले.  

   आळंदी मंदिरात एकादशी निमित्त प्रवचन सेवा, परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर तसेच इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची गर्दी झाली होती. इंद्रायणी नदीत स्नान करून येथील तीर्थक्षेत्रीचे स्थान महात्म्य जोपासले. भाविकांनी इंद्रायणीचे पाण्याने आचमन करीत दर्शनास गर्दी केली. वारकरी, भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस विभागाने दक्षता घेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने कारवाई करीत दंड आकारणी केली. पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत करून रहदारीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत परिश्रम घेतले. यासाठी वाहतूक पोलीस, आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, दिघी पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी कायदा, सुव्यवस्था, शांतता सुव्यवस्थेस सेवक, कर्मचारी यांचे माध्यमातून काम पाहिले.        

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती

इंद्रायणी आरती सेवा समिती राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट  स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.    

  यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, गोविंद ठाकूर तौर,  माउली घुंडरे पाटील, लता वर्तले, नीलम कुरधोंडकर, सरस्वती भागवत,  शोभा कुलकर्णी, तारामती गोरे, पुष्पा लेंडघर, काशीबाई अडगणे, जयश्री भागवत, सावित्री घुंडरे पाटील, राणी वाघ, अनिता शिंदे, उषाताई पाटील, सुरेखा काळभोर, कौशल्य देवरे, विमल मुसळे, सावित्रा घुंडरे,  सुवर्णाताई काळे, अनिता काळे, सुरेखा कुऱ्हाडे पाटील, इंदुबाई गावडे, आदिती शिंदे, गोविंद ठाकूर,  माऊली घुंडरे पाटील, रोहिदास कदम, काका मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आळंदी देवस्थान तर्फे आयोजित प्रसंगी विश्वस्त रोहिणी पवार, माजी नगरसेविका मालन घुंडरे, संजय घुंडरे पाटील आदी सह श्रींचे पुजारी, देवस्थानचे सेवक यांनी वेदमंत्र जयघोषात आरती केली. या प्रसंगी पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

  इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी इंद्रायणी आरती सेवा समिती चे वतीने संयोजक अनिता झुजम, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने लावलेला ३१ फूट उंच भगवा ध्वज इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराची पाण्याने बाधित होऊन खाली येऊन तुटल्याने नव्याने ध्वज उभारण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. या संदर्भात पंचनामा करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत

थोडे नवीन जरा जुने