आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स डे निवृत्ती आरोग्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांनी डॉक्टर्स डे निमित्त आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भेटून हार्दिक शुभेच्छा दिल्या. आळंदी ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सेवेचा दर्जा त्यांनी वाढविला. रुग्ण संख्या मोठी असून देखील सर्व रुग्णांचे आरोग्य काळजी घेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. गोरगरीब, शोषित पिढितांना योग्य उपचार त्यांनी पुरविले. आळंदी शहरातील तमाम झोपडपट्टी धारक, पथविक्रेता, आळंदी ग्रामस्थ यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. यांच्या सह त्यांच्या सर्व टीमला पुणे जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, संलग्न पथारी सुरक्षा दल सह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा निलम सोनवणे, आळंदी नगरपरिषद सदस्य काजल धोंडगे, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा सहसचिव धीरज कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका कार्याध्यक्षःदत्ता कांबळे आदी उपस्थित होते.
