!-- afp header code starts here --> जय हरी माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – निगडी आगमन

जय हरी माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – निगडी आगमन

आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड, निगडी नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांचे पुष्पवृष्टी करून तसेच पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखीच्या मंगल दर्शनाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

या शुभप्रसंगी श्रीकृष्ण मंदिर, निगडी येथे सर्व वारकरी बांधवांसाठी महाप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत या सेवाकार्यात सहभागी होत संतसेवेचा आनंद अनुभवला.

या पवित्र सेवाकार्यात मोलाचे सहकार्य करणारे सर्व मित्रपरिवार, कार्यकर्ते, युवा प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व नागरिक यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळे ही सेवा यशस्वीरीत्या पार पडली.



आपले,

सचिन चिखले

शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड शहर

अश्विनी सचिन चिखले मराठे

मा. नगरसेविका

आयोजक:

श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, निगडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड शहर

युवा प्रतिष्ठान

राम कृष्ण हरी

थोडे नवीन जरा जुने