!-- afp header code starts here --> दरड कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील मावळ तालुक्यात दुर्दैवी दुर्घटना

दरड कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील मावळ तालुक्यात दुर्दैवी दुर्घटना

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक विसापूर किल्ल्याजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये नंदू टिकोणे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, मोठा आवाज झाल्यानंतर किल्ल्याच्या उतारावरील माती व दगडांचा मोठा भाग खाली कोसळून टिकोणे कुटुंबाचे घर ढिगाऱ्याखाली दबले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. शोधमोहीमेदरम्यान तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मावळसह पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील माती पूर्णपणे भिजली असून दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिसराची पाहणी सुरू केली असून दरडप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकतेनुसार अशा भागांतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे.

थोडे नवीन जरा जुने