संत महंतांच्या हस्ते पूजन करून टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल
पिंपरी चिंचवड : दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सात टॅंकर पालखी सोहळ्यासोबत पाठविण्यात येत आहेत. संत महंतांच्या हस्ते टँकरचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. यावेळी दिंडी प्रमुखांचाही सत्कार आणि ५०० हून अधिक वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, उद्योजक बाळासाहेब काटे, ह.भ.प. ज्ञानेश्वर (छोटे माऊली) कदम महाराज, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, विश्वस्त ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, ह.भ.प. तांदळे महाराज, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ह.भ.प. बाळासाहेब शेटे, ह.भ.प. दिलीप पडवळ, राष्ट्रीय शिव कीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ महाराज, सीआरपीएफ जावन उमेश मिसाळ, वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, न्यायाधीश रमेश उमरगेकर यांच्या हस्ते टँकरचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचा पारंपरिक पद्धतीने टोपी, उपरणे आणि श्री तुकाराम गाथा' व 'ज्ञानेश्वरी' ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दरम्यान सोपानकाका कराडकर दिंडी क्र. ११, स्वयंभू श्रीराम प्रभू दिंडी दिंडी क्र. ३३६, कमळेश्वर दिंडी, कै. ह.भ.प. धोंडुजीबुवा चिझघरकर - दिंडी क्र. १८ (सालगांवकर), ह.भ.प. बाबूराव तांदळे महाराज दिंडी क्र. १९७, तसेच देहू ते पंढरपूर दरम्यान श्रीक्षेत्र नवलाख उंब्रे, मावळ, श्री क्षेत्र भंडारा डोंगर प्रासादिक दिंडी हवेली तालुका दिंडी क्र. २१ च्या मागे, श्री रोकडोबा दादा दिंडी दिंडी क्र. २० (रथा पुढे) आदी दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत.
ह.भ.प. छोटे माऊली कदम महाराज यांनी अरुण पवार यांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याचा विशेष गौरव केला. ते म्हणाले, वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची तहान भागवणे हे फार मोठे पुण्यकर्म आहेच, पण त्यासोबतच ५०० हून अधिक वृक्षांचे दान करून निसर्ग रक्षणाचा पवित्र संदेश देणे ही खरी ईश्वरसेवा आहे.
प्रा. डॉ. गजानन वाव्हळ महाराज यांनी अरुण पवार यांच्या अखंड सुरू असलेल्या देश आणि देवकार्याचे भरभरून कौतुक केले. ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अरुण पवार करत आलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी लावलेले हजारो वृक्ष डौलाने उभे आहेत.
अरुण पवार म्हणाले, की अखंडपणे सुरू असलेल्या या लोकसेवेचे हे दशकपूर्ती वर्ष आहे. या अनोख्या उपक्रमांतर्गत वारीत जाणाऱ्या विविध दिंड्यांना ७ भव्य टँकर्सद्वारे संपूर्ण वारी मार्गावर मोफत आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सेवा पुरवली जात आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही जलसेवेसोबतच वृक्षदानाचा संकल्प केला आहे.
खारीचा वाटा म्हणून स्थानिक हास्ययोग परिवार, नवचैतन्य हास्य क्लब आणि विविध सामाजिक संस्थांचे सदस्य ज्योति कांबळे, संगीता माने, हेमलता कुंभार, शोभाताई माने, उज्ज्वला टिळेकर आदी सदस्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी कॅप्टन युवराज माने, ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, आशिष पवार, ह.भ.प. संजय ढोरे, अर्जुन खामकर, ह.भ.प. अशोक ढोरे, वामन भरगंडे, किशोर अट्टरगेकर, बालाजी पांचाळ, अनिता पांचाळ, दत्तात्रय धोंडगे, बाळासाहेब साळुंके, मोहम्मदशरीफ मुलानी, नागनाथ लोंढे, नंदकुमार धुमाळ, शिवाजी घोडके, हास्ययोग परिवार संघ परिवार, सुग्रीव पाटील, लक्ष्मण जाधव, गोकुळ शितोळे, संतोष भोरे आदी उपस्थित होते. विजयराज नागरी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत कुरूलकर, व्यवस्थापक युवराज नलावडे, वामन भरगंडे, सकाराम वालकोळी, सोमेश्वर झुमके, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लब (राजमाता गार्डन ग्रुप), हास्ययोग परिवार संस्था या संस्थांचे पदाधिकारी, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी, दिंडी प्रमुख, वारकरी उपस्थित होते.

