!-- afp header code starts here --> वन महोत्सवानिमित्त श्री शाहू मंदिर महाविद्यालयात वृक्षारोपण

वन महोत्सवानिमित्त श्री शाहू मंदिर महाविद्यालयात वृक्षारोपण

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने वन महोत्सवा निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

  या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील प्रमुख उपस्थित होते. या वेळी  डॉ. रमेश देसाई (कला विभाग प्रमुख), डॉ. प्रवीण जाधव (वाणिज्य विभाग प्रमुख), डॉ. राणी शितोळे ( रासेयो कार्यक्रम अधिकारी), प्रा. भाऊसाहेब जाधव ( रासेयो कार्यक्रमा अधिकारी ), डॉ. एस. पी. शेंडे, (राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख), डॉ. मीना ठाकूर, प्रा. जीवन घाणेकर, प्रा. प्रतीक भोसले, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. "वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे," असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.

  राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

थोडे नवीन जरा जुने