MGID Header Code
Code End

दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात वाटपाचे शिबिर संपन्न

 


पिंपरी चिंचवड : महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे व इनाली फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ पुणे टाऊनशिप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २१ऑगस्ट २०२६ रोजी औंध येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयामध्ये ५३ दिव्यांगांना मोफत कृत्रिम हाताचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन औंध  जिल्हा रुग्णालयाचे चिकित्सक डॉ. देवमाने, महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प प्रमुख  विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, अभिजित मुरूमकर,नंदकुमार फुले, बाबुराव अहिरे, रमेश मुसूडगे हे उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील जालना नांदेड, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, जुन्नर या जिल्ह्यातून लाभार्थीने लाभ घेतला या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे च्या समन्वयक  भाग्यश्री मोरे,व कर्मचारी रोहित गंभीर यांनी केले होते

थोडे नवीन जरा जुने