MGID Header Code
Code End

ग्लोबल गुरुजी पुरस्कार अनिता परदेशी यांना जाहीर

 


धानोरे जिल्हा परिषद शाळेचे कौतुक 

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : पुणे जिल्हा परिषदेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिंगापूर येथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावरची शिक्षण पद्धती पुणे जिल्हा परिषदेमध्ये राबविण्या साठी सुरू केलेल्या ग्लोबल गुरुजी पुरस्कारासाठी बाराशे शिक्षकां मधून निवड जाहीर झाली. 

 ही निवड झालेल्या ४५  शिक्षकांमध्ये पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे पुणे शाळेच्या आदर्श शिक्षिका अनिता शरद परदेशी  यांची निवड झाल्या बद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून  पुढील दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांचेसह सर्व शिक्षक वृंद पुणे जिल्हा परिषद आदर्श  प्राथमिक शाळा धानोरे, शाळा व्यवस्थापन समिती धानोरे, ग्रामपंचायत धानोरे, 

विद्यार्थी व शिक्षक वृंद आदर्श शाळा धानोरे यांचे तर्फे निवडीचे स्वागत करण्यात आले. 

  ही शाळा ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार घटकातील असून परिवार तर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने