MGID Header Code
Code End

पुणे जिल्ह्यातील व पुणे ग्रामीण गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला निर्बंध

 

पुणे (वर्षा चव्हाण) :  पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ ते २५ सप्टेंबर गणेश उत्सव दरम्यान अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

पुणे जिल्ह्यातील व पुणे ग्रामीण भागातील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळ आढळून आल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळांवर शिक्षेस पात्र ठरणारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत व सुरक्षितपणे पार पाडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने