पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य अभियंता प्रमोद ओंबसे यास एसीबीने (ACB) केलेली अटक ही अत्यंत महत्त्वाची कारवाई आहे. या कारवाईचे आम्ही मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो!
परंतु, फक्त अधिकारीच नव्हे, तर या सगळ्या भ्रष्टाचारामागे असणारे भ्रष्ट राजकीय पुढारी कधी जेलमध्ये जाणार? त्यांना कोण आत टाकणार? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेमके कोणते राजकीय पुढारी आहेत, हे उजेडात आलेच पाहिजे.
भ्रष्टाचाराला कायमचा आळा बसण्यासाठी आणि या भ्रष्ट राजकीय नेत्यांना थेट गजाआड करण्यासाठी आता एक अत्यंत कठोर व सक्षम कायदा करण्याची नितांत आवश्यकता आहे!
— डॉ. बाबा कांबळे
(राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन कष्टकरी जनता आघाडी तथा नेते, कष्टकरी वर्ग)
