MGID Header Code
Code End

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) ला चिंचवडमध्ये मोठा धक्का; विधानसभा अध्यक्ष कविता कोंडे-देशमुख यांचा कार्यकर्त्यांसह आम आदमी पार्टीत प्रवेश


खासदार संजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश, प्रदेश सचिव अभिजीत मोरे यांच्या हस्ते स्वागत

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष सौ. कविता कोंडे देशमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनंदा दुधाळ यांनी आपल्या  समर्थकांसह आज आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मा. संजय सिंग यांच्या विशेष उपस्थितीत आणि प्रदेश सचिव मा. अभिजीत मोरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाच्या विचाराने आणि दिल्ली-पंजाब मधील शिक्षण, आरोग्य व जनहिताच्या कामांनी प्रभावित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे यावेळी कविता कोंडे देशमुख यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराविरोधात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून लढा अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, शहर उपाध्यक्ष अशोक लांडगे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आम आदमी पार्टीची ताकद अधिक वाढली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संपर्क:

वैजनाथ शिरसाट

शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड

मो.8788732858

थोडे नवीन जरा जुने