तहसीलदार जयराज देशमुख यांचे द्वारे मुख्यद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून शेती व शेतीवर अवलंबित सर्व घटक यामध्ये बाधित झालेला आहे या सर्व घटकांना अर्थसाह्य देण्यात यावे व दुष्काळ निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत दुष्काळ निवारण व निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते मानव कांबळे, मा. नगरसेवक मारुती भापकर कामगार नेते काशिनाथ नखाते,काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, प्रदीप पवार, इरफान चौधरी, सहदेव होनमने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समिती समिती - पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने आज, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मच्छीमार, कारागीर समूह, महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत देऊन, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्यात यावी. दुष्काळग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी दुष्काळातील दुष्काळग्रस्त गावा गावे वाड्यावर त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेऊन त्यातून स्थानिकांना रोजगार निर्माण करावा दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षण सुरू राहण्यासाठी या वर्षी व पुढील वर्षी आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भागात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी योजना अंतर्गत कामाची उपलब्धता करून द्यावी, पशुधनासाठी मोफत चारा पाणी पशुवैद्यकीय सेवा चारा डेपो छावण्या उपलब्ध करून द्यावा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून प्रतिव्यक्ती दहा किलो धान्य निर्माण करून द्यावे. आदी मागण्यांचा समावेश होता.
