MGID Header Code
Code End

पीसीयू मध्ये ऑटोमेशन, करिअरच्या संधी आणि अप्रेंटिसशिप या विषयावर उद्योग परिसंवाद संपन्न

 


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे "ऑटोमेशन करिअर ऑपॉर्च्युनिटीस अँड अप्रेंटीसशीप इन आयटीइ" या विषयावर विशेष उद्योग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी औद्योगिक, ऑटोमेशनचे बदलते तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ आणि भविष्यातील करिअरच्या संधी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            इंटरनॅशनल टेस्ट इक्विपमेंटचे (आयटीइ) अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नेत्रेश रेगे, इंटरनॅशनल व्हील अँड टायर इंकचे घनेम जंदाली, जेफ स्कोम्स्की, जर्मनीतील मिकॉन टेक्निक इंटरनॅशनलचे झ्बिग्न्यू स्कुटनिक आणि थॉमस ओझारी, पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे आदींनी औद्योगिक अभियांत्रिकी, ऑटोमेशन, यांत्रिक अभियांत्रिकी, चाचणी उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयांवर मार्गदर्शन केले.

    नेत्रेश रेगे यांनी इंटरनॅशनल टेस्ट इक्विपमेंटचे उत्पादन, ग्राहकवर्गाची आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कार्यपद्धतीची माहिती आणि औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील उदयोन्मुख संधी या विषयावर मार्गदर्शन केले.

     उद्योजक घनेम जंदाली यांनी अभियांत्रिकीतील नव कल्पना, औद्योगिक उपयोग आणि तांत्रिक ज्ञानासोबत उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व सांगितले.  

   मिकॉन टेक्निक इंटरनॅशनलचे प्रतिनिधी झ्बिग्न्यू स्कुटनिक आणि थॉमस ओझारी यांनी कंपनीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील क्षमता, विशेष यंत्रनिर्मिती आणि औद्योगिक ऑटोमेशन साठी उपलब्ध तांत्रिक उपाययोजनांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानातील बदल आणि विशेष अभियांत्रिकी उपाययोजनांची वाढती मागणी याबाबत माहिती दिली.

       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयु कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीयु नियमक मंडळ सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

   समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. करिअरच्या संधी, अप्रेंटिसशिप, व्यावसायिक क्षेत्रातील अपेक्षा आणि शैक्षणिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगात उपयोग, औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील बदलते स्वरूप, विविध क्षेत्रांतील बाजारपेठेच्या संधी, जागतिक उद्योगविषयक कल, उत्पादन विकास, ग्राहकांच्या गरजा आणि आधुनिक उत्पादन प्रक्रियेत प्रगत चाचणी उपकरणांचे वाढते महत्त्व अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

थोडे नवीन जरा जुने