Health : फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे एक मजबूत सुरक्षा कवच मानले जाते. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे. यालाच आरोग्य विमा असे संबोधले जाते.
मात्र, अलीकडच्या काळात एक चिंता उद्भवली आहे – हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांसाठी पॉलिसीचं नुतनीकरण (renewal) करणे कठीण होत आहे. विशेषतः वरिष्ठ आणि जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही वाढ आणखी जास्त प्रमाणात होत आहे.
प्रीमियम वाढतंय का?
गेल्या वर्षभरात अनेक केसेसमध्ये हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम १५% पेक्षा अधिक वाढले आहेत. वरिष्ठ नागरिकांमध्ये ही वाढ आणखी जास्त आहे.
प्रीमियममध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढीबद्दलच्या तक्रारीमुळे इन्शुरन्स रेग्युलेटर IRDAI ने यावर्षी जानेवारीमध्ये निर्देश दिले की ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पॉलिसीधारकांच्या प्रीमियममध्ये दरवर्षी १०% पेक्षा जास्त वाढ करता कामा नये.
प्रीमियम वाढण्यामागील कारणे
*वैद्यकीय महागाई – हॉस्पिटल खर्च, औषधं आणि डायग्नोस्टिक टेस्ट्सच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
विमा कंपन्यांवर येणाऱ्या क्लेम्सचा भार वाढला आहे.
वय वाढल्याने आरोग्याच्या जोखमी (health risks) वाढतात, ज्याचा परिणाम प्रीमियमवर होतो.
पैसे कसे वाचवायचे? – काही महत्त्वाचे उपाय
तरुण वयात पॉलिसी घ्या– वय लहान आणि आरोग्य उत्तम असेल, तर प्रीमियम कमी असतो.
फॅमिली फ्लोटर प्लान निवडा
एकाच पॉलिसीत संपूर्ण कुटुंबासाठी कव्हर मिळतो. लहान मुलांना फ्लोटरमध्ये आणि वडीलधाऱ्यांना वेगळी पॉलिसी घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
टॉप-अप प्लान घ्या
बेस कव्हर १० लाखांचं घ्या आणि उर्वरित ९० लाखांचं टॉप-अप. प्रीमियम कमी आणि कव्हरेज जास्त मिळतो.
लांब कालावधीची पॉलिसी घ्या – एकाच वेळी ३–४ वर्षांचा प्रीमियम भरल्यास सवलत मिळते.
नेटवर्क हॉस्पिटलचा उपयोग करा – ज्यामुळे कॅशलेस ट्रीटमेंट मिळते आणि प्रीमियमही कमी होतो.
सिबिल स्कोअर चांगला ठेवा – काही कंपन्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर प्रीमियम सवलत देतात.
पॉलिसी वेळेवर रिन्यू करा –उशीर केल्यास दंड लागू शकतो आणि कव्हरेजही रद्द होऊ शकतो.
हेल्थ इन्शुरन्सचे फायदे
सेव्हिंग्स सुरक्षित राहतात – गंभीर आजार किंवा आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय खर्च इन्शुरन्स कंपनी करते.
कॅशलेस ट्रीटमेंट – पॉकेटमधून पैसे देण्याची गरज नाही.
*मॅटरनिटी, डे केअर फायदे –* काही पॉलिसींत हे फायदे दिले जातात.
टॅक्स बेनिफिट्स – सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स सूट मिळते (Old Tax Regime मध्ये).
पॉलिसी घेताना या गोष्टी तपासा
नेटवर्क हॉस्पिटल्स – तुमच्या जवळपास कॅशलेस सुविधा असलेल्या हॉस्पिटल्स आहेत का, हे पाहा.
प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर –सामान्यतः 30–60 दिवस आधी व 60–180 दिवस नंतरचे खर्च कव्हर होतात.
कव्हरेज लिमिट्स - उदा. मॅटरनिटी कव्हरेजवर मर्यादा.
को-पे क्लॉज – काही रकमेचा खर्च तुम्हालाही उचलावा लागू शकतो.
प्री-एक्झिस्टिंग डिसीज आणि वेटिंग पीरियड
यांची अटी नीट वाचा. काही आजारांवर सुरुवातीला कव्हर मिळत नाही.
IRDAI च्या नियमानुसार, पॉलिसी घेतल्यापूर्वी ४८ महिन्यांत उपचार घेतलेली कोणतीही समस्या ‘प्री-एक्झिस्टिंग डिसीज’ मानली जाते – म्हणून ही माहिती लपवू नका.
वेटिंग पीरियड
बहुतांश पॉलिसींमध्ये २ ते ४ वर्षांचा वेटिंग पीरियड असतो.
*हेल्थ इन्शुरन्स हा खर्च नसून गुंतवणूक आहे*
योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं पॉलिसी घेतल्यास तुम्ही मोठ्या आर्थिक संकटातून वाचू शकता.