पिंपरी चिंचवड - देशभक्त संयोजन समितीचे सदस्यांना नितीन चिलवंत यांचे आवाहन केले आहे.
विषय : एक कविता भारतीय सैनिकांसाठी ... एक कविता मातृभुमिच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांसाठी ...
देशभक्तीच स्फुल्लीगं ... मना मनात पेटवणार... राष्ट्रभक्ती संस्करण महाकविसंमेलन शुक्रवार दि . १५ ऑगस्ट २०२५ रोजी राजे शिवाजीनगर येथे सकाळी ८ . ०० ते सायं : ६ . ०० वाजेपर्यंत आयोजीत करण्याची संकल्पना वास्तवात रुपांतरीत करण्यासाठी यशस्वी नियोजन नियोजन करण्यात आले आहे.
कोणतीही ही संकल्पना वास्तवात रुपांतरीत करीत असतांनी त्याचे नियोजन अभ्यासपुर्ण करावे लागते त्या विषयीची माहिती सविस्तर पणे आपणास देत आहोत.
१ ) प्रथम आपणास आपल्या संकल्पनाच एक आवाहन पत्र व आपल्या संकल्पनाच डिझाइन दि . २९ जुलै ते दि . ३१ जुलै २०२५ पर्यंत पिंपरी चिंचवड, देहु, आळंदी व परिसरातील सर्व साहित्यिक , लेखक व कवी यांच्या पर्यंत सोशल मिडीयातुन पोहचविण्याच कार्य सर्वांनी मना पासुन करणे.
२ ) आपण सर्वांना सोशल मिडियातुन आपली संकल्पना पाठविल्या नंतर दि . १ ऑगस्ट ते दि . ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कविचीं नाव व संपर्क नंबर जास्तीत जास्त ५०० ते कमीत कमी २०० कवीची यादी तयार करणे.
३ ) आपल्या कडे एकदा कविचीं यादी तयार झाली कि प्रत्येकाला आपली संकल्पना आवाहन पत्र व संकल्पनाच डिझाइन पाठवुन त्यांचा सोशल मिडीयातुन होकार घेण्यात येईल याच दरम्यान महत्वाच्या कवीनां संपर्क करण्यात येणार त्यांच्या वर त्यांच्या कवि मित्रांची जबाबदारी देण्यात येणार आहे.
४) आपणास रितसर डॉयगोनॉल मॉल बिजनेस सेंटरच्या प्रमुख अध्यक्ष व पदाधिकारी व्यापारी यांना पत्र देऊन मान्यता रविवार दि . ३ ऑगस्ट २०२५ रोजी घ्यावी लागणार त्यांनी होकार दिला तर ठिक नसता श्रीगणपती मंदिराच्या अध्यक्षानां पत्र देऊन त्यांची मान्यता घेऊ या!
५ ) ९ ऑगस्ट क्रांति दिनाच्या शुभ मुहुर्तावर पद्दश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या शुभहस्ते सकाळी ९ . ३० वाजता क्रांतितीर्थ चाफेकर स्मारक समिती आपल्या १५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या राष्ट्रभक्ती संस्करण महाकविसंमेलन पत्रिकेची उद्घाटन करुन कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
सकाळी : ११ . ०० वाजता श्री . संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ आळंदी येथे पत्रिका अर्पण करण्यात येणार व दुपारी १२ . ३० वा श्री . संत तुकाराम महाराज मंदीर देहुगावं येथे पत्रिका अर्पण करण्यात येणार आहे.
आपणास राष्ट्रभक्ती संस्करण महाकवि संमेलनासाठी खर्च अपेक्षीत प्रायोजक घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील .
१) डॉयगोनॉल मॉड सजावट डेकोरेशन , बसण्यासाठी व्यवस्था व पाऊस येणार असल तर वॉटर फ्रुफ मंडप टाकणे
२) कविसाठी चहा - पाणी - वडापाव - व्हेज बिर्याणी - कोंशीबीर व्यवस्था
३) एक पुस्तक एक वृक्ष रोप व्यवस्था
४) कवींची आरोग्य तपासणी शिबीर जमल तर रक्तदान शिबीर
मला जेवढ सुचल तेवढे प्रामाणिक नियोजन केले आहे . माझ्या कडुन राहिल असल आणि आपणास सुचले असेल तर आपण लिहावी.
आपला स्नेहांकित
नितीन चिलवंत
पिंपरी चिंचवड, पुणे