Kolhapur : भोसरीगांवचे पैलवान काळुराम लांडगे यांना कोल्हापुर येथे राष्ट्रीय कामगार रत्न पुरस्काराने सन्मानित

 


चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : सध्याची भयावह परिस्थिती पाहता, माणूस माणसापासून लांब जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चालला आहे. अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे. आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसाने एकत्र येऊन चांगले घडविण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर मध्ये राजर्षी शाहु महाराज भवन येथे समाजातील सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करणेत आले होते.
पुरस्कार प्रेरणा देतात , प्रेरणेनच राष्ट्र मोठे होते, प्रेरणा आणि प्रोत्साहन जीवनात विशेष उंची गाठण्यासाठी शक्ती वर्धकाचे काम करतात म्हणुनच गुणवत्तेबद्दल आदर करत आणि गुणांची कदर करत राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा "राष्ट्रीय कामगार रत्न  २०२५" हा पुरस्कार भोसरीगांवचे पैलवान काळुराम लांडगे यांना  महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदचे  विरोधी पक्ष गटनेते व माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा व शाल देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.


यावेळी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनिता बहेनजी, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष, निर्माता , लेखक, कवी अनिल म्हमाने, केंद्रीय श्रमिक बोर्डचे चेअरमन डॉ. रविकांत पाटील, सहाय्यक  कामगार आयुक्त विशाल घोडके,   कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे उपस्थित होते.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, गायन, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण, समाज रत्न, आदर्श संपादक, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक / शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, आदर्श संस्था, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य व गायन भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न असे विविध एकुण ७० जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कार्थींचे नातेवाईक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले. तर आभार संजय सासने यांनी मानले.

सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर, संजय सासने, अनिता काळे, रूपाली निकम, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, प्रभाकर कांबळे, अशोक जाधव, अच्युतराव माने, केरबा डावरे, भरत सकपाळ, देवराव कोंडेकर व त्यांच्या सर्व टिमने  विशेष परिश्रम घेतले.

थोडे नवीन जरा जुने