Pune : दिवंगत नेते हनुमंत साठे पुरस्कार विशाल शेवाळे यांना जाहीर

 


पुणे :  आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते दिवंगत हनुमंत साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हनुमंत साठे पुरस्कार यंदा डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेचे अध्यक्ष विशाल शेवाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती संस्थेचे मातंग समाज समन्वय समितीचे समन्वयक प्रकाश वैराळ, विकास सातारकर, दत्ता जाधव व रवी आरडे यांनी दिली.

हा पुरस्कार मातंग समाज समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जातो. २०२५ सालचा पुरस्कार विशाल भाऊ शेवाळे यांना रिपब्लिकन दिवंगत नेते हनुमंतराव साठे पुरस्कार  समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने सारसबाग, पुणे येथे होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने