PCMC : सेवाभावी आदर्श, समर्पित नेतृत्वाचा वाढदिवस — मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाखांची मदत; भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना


पिंपरी-चिंचवड - “महाराष्ट्र सेवक” या समर्पित वृत्तीने राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विधायक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भोसरी विधानसभा मतदारसंघात ८ ठिकाणी महारक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी निखिल बोऱ्हाडे हेही उपस्थित होते.

#  सेवाभावी वाढदिवसाचे विधायक उपक्रम:


मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात

* महारक्तदान शिबिरे

आश्रमशाळांना मदत

दिव्यांग बांधवांसाठी सेवा उपक्रम

गोशाळांमध्ये चारा वाटप

असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणारी रक्कम गरजू व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणार असून, हा वाढदिवस खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या भावनेतून साजरा होत आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया:

“राज्याच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेतून काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील युवकांचे आदर्श आहेत.
त्यांचा वाढदिवसही सेवाभावातून साजरा होत आहे, याचा मला अभिमान वाटतो.
सेवा हीच खरी शुभेच्छा आणि समर्पण हीच खरी ताकद आहे – हे भाजपचे संस्कार आहेत.”

महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड

थोडे नवीन जरा जुने