PCMC : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे सामाजिक उत्तरदायित्वपर योगदान!"

 


पिंपरी चिंचवड - मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘उत्सव नव्हे, उत्तरदायित्व’ या प्रेरणादायी संकल्पनेचा आदर राखून आमदार श्री. अमित गोरखे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. १,००,००० (एक लाख रुपये) चे योगदान दिले.

सदर निधीचा धनादेश त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक कार्यासाठी वापरावे, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असून त्यानुसार जाहिरातबाजी, फलक, पोस्टर्स वा वृत्तपत्र जाहिराती टाळून आमदार अमित गोरखे यांनी थेट मदतीचा हात पुढे करत आदर्श उदाहरण सादर केले.

या प्रसंगी आमदार गोरखे म्हणाले, “मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला सामाजिकतेचा संदेश आणि त्यांची कार्यपद्धती ही खरी सेवा आणि कर्तव्यनिष्ठेची शिकवण आहे. त्यांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी गरजूंसाठी कृतीशील पावले उचलली पाहिजेत.”

तसेच, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अधिकाधिक नागरिक, जनप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि संस्था यांनी पुढे येऊन योगदान द्यावे,” असे आवाहनही श्री. गोरखे यांनी यावेळी केले.

थोडे नवीन जरा जुने