PCMC : लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कॉर्पोरेटची शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - चिंचवड़ येथील जैन विद्या प्रसारक मंडलची गुरुमैया प्राथमिक शाळांमध्ये डेंगू, मलेरिया या सारखा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लायन्स क्लब ऑफ़ पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट या क्लबचे वतीने जंतुनाशकची फवारणी करण्यात आली.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन रवींद्र काळे म्हणाले की, पावसाळ्यात पिंपरी चिंचवड शहरात विविध साथीचे आजार पसरतात.अनेक ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारखे गंभीर आजाराने शालेय विद्यार्थी आजारी पडतात. त्यामुळे आम्ही जैन विद्या प्रसारक मंडलची गुरुमैया प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापनाला मदत म्हणून शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी केली आहे.
यावेळी सेक्रेटरी लायन अनिल गालिंदे, खजिनदार गजानन चिंचवडे लायन मोहन लोंढे, लायन हंबीर आवटे , शाळांचे मुख्याध्यापक दहिफळे सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते