पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - श्री गजानन सत्संग मंडळाचे चिंचवड येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गजानन महाराज यांना सामुदायिक अभिषेक तसेच स्वररंजनी हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आनंदात तसेच धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळी ५ वाजून 30 मिनिटांनी श्रींना मंत्रोच्चाराच्या गजरात सामुदायिक अभिषेकास सुरुवात झाली सुमारे 100 भक्तांनी या अभिषेक उपक्रमामध्ये सहभाग घेतला सकाळी साडेसहा वाजता अभिषेक पूजन संपन्न झाले.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी पाच वाजता मेघना मराठे व सहकलाकार यांचा सुमधुर गीतांचा स्वर रंजनी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास चिंचवड व परिसरातील तरुण वर्गातील भक्त तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण खूप मोठे होते सर्व भक्तांनी सुमधुर गीतांच्या या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
सायंकाळी सात वाजता महाआरती संपन्न झाली त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी सुमारे तीन ते साडेतीन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गुरु पौर्णिमेचा हा उत्सव आनंदात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
स्वररंजनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांचे आभारप्रदर्शन किशोर कदम यांनी केले,
कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सर्व पदाधिकारी विश्वनाथ धनवे,प्रताप भगत,श्रीपाद जोशी, विष्णू पूर्णये, दत्तात्रय सावकार, संजय खलाटे, देविदास कुलथे, श्रीकांत आणावकर, महेश गोखले, सचिन बलकवडे व कायदेशीर सल्लागार धनंजय कुलकर्णी व कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे केले.