PCMC : लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार डिस्टिक वुमन एम्पॉवरमेंट संयुक्त विद्यमाने आरोग्य दंत स्किन तपासणी शिबिराचे आयोजन


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - चिखली पोलीस स्टेशन येथे लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार, माधवबाग पिंपरी, गुंजकर हॉस्पिटल आणि एव्हिस स्किन क्लिनिक यांच्या सहकार्याने लायन प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
(दि. १४) मोफत आरोग्य, दंत व स्किन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सुमारे ५० पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली.




सेवा देणारे डॉक्टर:
# लायन डॉ. शितल मोरे – माधवबाग पिंपरी

#  लायन डॉ. प्रज्ञा देवकाते – देवकाते डेंटल केअर

# लायन डॉ. स्वाती देवरे – एव्हिस स्किन क्लिनिक

# लायन डॉ. भाग्यश्री गुंजकर – गुंजकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पूर्णा नगर,चिंचवड

या सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
डॉक्टरांनी सकाळी ९ वाजता वेळेवर उपस्थित राहून, समाजासाठी अतिशय समर्पित व निःस्वार्थ सेवा दिली. त्यांच्या सेवाभावामुळेच हे शिबिर यशस्वी ठरले. समाजाच्या आरोग्यसेवेतील त्यांच्या योगदानाचे मनापासून कौतुक करण्यात आले.



या शिबिरास विठ्ठल साळुंखे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, अमोल फडतरे सर – पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, राम गोमारे सर – सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर सर – सहाय्यक पोलीस निरीक्षक,  स्नेहा खरात मॅडम – महिला पोलीस उपनिरीक्षक, दिपमाला लोहकरे मॅडम – महिला पोलीस हवालदार यांची विशेष उपस्थिती होती. तसेच इतर अनेक पोलीस अधिकारी व PSI उपस्थित होते.

शिबिरासाठी परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल
विठ्ठल साळुंखे सरांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी लायन्स सदस्य प्रेसिडेंट लायन विद्या वकारे, सेक्रेटरी लायन डॉ. शितल मोरे, ट्रेझरर लायन डॉ. प्रज्ञा देवकाते, लायन प्रीती बोंडे – (District Chairperson, Women Empowerment), लायन नितेश बोंडे, लायन जयंत बोंडे, लायन डॉ. स्वाती देवरे, लायन डॉ. प्रेरणा गोपाळे, लायन सुनील भोयर, लायन जितेश वकारे, लायन अमोल तुरखडे उपस्थित होते.

लायन प्रीती बोंडे (Club Administrator डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन वूमन एम्पॉवरमेंट) यांनी सर्व डॉक्टर, लायन्स टीम व पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने