PCMC : बाबुरावजी घोलप महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा



पिंपरी चिंचवड -  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाणिज्य विभागाने एक दिवसीय कार्यशाळा "Consumer Guidance to Society and Financial literacy" या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून Consumer Guidance Society of India कमिटी मेंबर शिरीष कामदार यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणजे काय व ग्राहकाने कशाप्रकारे कोणतीही वस्तू घेत असताना काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले . जसे वस्तूचे वजन किंमत व वस्तूची वैशिष्ट्ये याविषयी मार्गदर्शन केले.

त्यानंतर मयूर शहा यांनी आर्थिक नियोजन कसे करावे? आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनाचे विविध प्रकार व आर्थिक नियोजन भविष्यकाळासाठी कसे उपयोगी आहे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉ.संगीता जगताप मॅडम उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ वंदना पिंपळे मॅडम तसेच वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. मनीषा त्रंबके यांनी कामकाज केले. प्रा.सुषमा सोनार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरला.


थोडे नवीन जरा जुने