Ration Card : केंद्र सरकारने रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. आता केंद्र सरकारने ज्या रेशन कार्डधारकांनी सलग सहा महिने रेशन घेतले नाही, त्यांचे रेशन कार्ड निलंबित केले जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी नागरिकांना अनुदानित धान्य (गहू, तांदूळ, भरड धान्य) आणि इतर अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, अनेक ठिकाणी बनावट रेशन कार्ड, अपात्र लाभार्थी, आणि मृत व्यक्तींच्या नावावर रेशन घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ज्या रेशन कार्डधारकांनी सलग सहा महिने रेशनवरील धान्य किंवा इतर वस्तू घेतल्या नाहीत, त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय (inactive) समजले जाईल.
निष्क्रिय कार्डधारकांची पात्रता तपासण्यासाठी पुढील तीन महिन्यांत घरोघरी तपासणी केली जाईल. यामध्ये लाभार्थीचा पत्ता, उत्पन्न, आणि धान्याची गरज याची पडताळणी होईल. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे आधार कार्डशी जोडलेली माहिती तपासली जाईल. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 23 कोटी सक्रिय रेशन कार्डांपैकी 7 ते 18 टक्के कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
Ration-card-will-be-cancelled if-ration-is-not-taken-for-six-months-Central-government-decision